सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२०.०५.२०२०
पाटण- कोरोना रुग्ण सापडलेल्या ताईचीवाडी शिरळ व बनपुरी गावाला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईनी तातडीने दिल्या भेटी. या भेटीत ताईचीवाडी शिरळ व बनपुरी या गावात येथील गावकऱ्यांना नाकाबंदी काळात जीवनावश्यक साहित्य पुरविण्याची व्यवस्था तसेच आवश्यकते नुसार दिवसातून किमान एकदा आरोग्याची तपासणी करण्याकरीता आरोग्य पथकाची नेमणूक करण्याच्या व गांवात लोकांना पिण्याचे पाणी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सुचना केल्या दोन्ही गांवाच्या नाकाबंदीची पहाणीही केली. या दोन्ही गावातील लोकांची विचारपुसही केली. यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे सोबत पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, तहसिलदार समीर यादव, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर.बी.पाटील, कोयना विभागाचे स.पो.नि.मंगेश बावीकट्टी, ढेबेवाडीचे स.पो.नि. उत्तम भजनावळे तसेच या दोन्ही गांवातील प्रमुख कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.



















