सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२०.०५.२०२०
पाटण- कोरोना विषाणूच्या महामारीने जगभरात धुमाकूळ घातलेला आहे परंतू या विषाणूची लागण आतापर्यत पाटण तालुक्यातील कोयना विभागा पर्यत नव्हती. आतापर्यत कोरोनामुक्त असणारा कोयना विभागाला घर वापसी करणाऱ्या लोकांमुळे प्रसाद मिळाला आहे. पाटण तालुक्यातील कोयना विभागातील शिरळ गावात ६ दिवसांपूर्वी अहमदाबाद वरून आलेल्या कुटुंबातील ७० वर्षाच्या वयोवृद्ध माणसाला कोरोनाची लागण झालेली आहे. या बाधित झालेल्या रुग्णाला कराड येथील कृष्णा रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेले आहे. खोकला, ताप व श्वसन त्रास असलेला या रुग्णाला मधुमेह आहे. मंगळवारी दि.१९ रोजी हेळवाक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेवुन हा रुग्ण पाटण येथील बर्गे हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात दाखल झाला होता या रुग्णाला कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने बर्गे हॉस्पिटलच्या व्यवस्थापनेने रुग्णाला पाटण ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. पाटण ग्रामीण रूग्णालयातून या रुग्णाला कराड येथील कृष्णा रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेले आहे.
अहमदाबाद वरून कुटुंबातील ४ लोकांबरोबर हा वयोवृद्ध रुग्ण स्वतःच्या गावी आला होता. या घटनेमुळे पाटण तालुक्यात कोरोनाचा पुन्हा शिरकाव झालेला आहे यामुळे शिरळसह आसपासची गावे प्रशासनाने सिल केलेली आहेत.



















