सातारा(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, दिपक माने
दि.६.०१.२०२३
सातारा- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमधे अत्यंत बिकट परिस्थितीतही कोणत्याच प्रकारची गद्दारी अथवा लाचारी न पत्करता, स्वाभिमानाने लढून पराभूत झालेल्या आणि पाटण तालुक्याचे भाग्यविधाते विक्रमसिंहजी पाटणकर यांच्या मार्गदर्शनानुसार,निष्ठापुर्वक लढून प्रतिस्पर्ध्यावर मात करून विक्रमी मतांनी विजयी झालेल्या निष्ठावान विजयी उमेदवारांचे व तमाम ग्रामस्थ मतदार यांच्या सत्कार सोहळ्याचे विषेश अतिथी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय श्री.जयंतराव पाटील यांचे पाटण नगरीत रामापूर पाटण येथे पाटण ग्रुप विविध कार्यकारी सह.सेवा सोसायटीच्या प्रांगणामधे पाटण अर्बन बँकेचे संचालक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आधारभूत जेष्ठ कार्यकर्ते श्री.अशोकरावजी गजरे, पाटण ग्रुप विविध कार्यकारी सह.सेवा सोसायटी पाटण (रामापूर)चे चेअरमन श्री.रघुनाथराव चौधरी, व्हा. चेअरमन श्री.संपतराव शिर्के, माजी.ग्राम पंचायत सदस्य श्री.संजयराव टोळे, सदर सोसायटीचे हितचिंतक आधारस्तंभ श्री.दत्तात्रय पाटील, सुनिल चौधरी,सातारा जि.म.बँकेचे भाग विकास अधिकारी श्री.इकबाल हकीम,पा.ग्रुप.वि.का.सह.से.सोसायटीचे सचिव.श्री.शंकरराव पवार, सोसायटी संचालक.सौ.अंजलीताई
जाधव,इत्यादी मान्यवरांनी पुष्पहारांनी सहर्ष स्वागत केले.या प्रसंगी राष्ट्रवादी राष्ट्रीय सामाजिक न्याय विभागाचे तालूका उपाध्यक्ष.श्री.कौशक देवकांत व पाटण शहर अध्यक्ष.गणेश नायकवडी, लक्ष्मण चव्हाण, दादासाहेब शिरसाठ,विशाल भिसे,
माजी ग्राम पं.सदस्य हणमंतराव अवघडे, बबलू सरकवास, चंद्रकांत टोळे, मारूतीराव नायकवडी, विष्णू पवार, आनंदराव पवार, सुरेश चौधरी, साहेबराव पिरजादे,हरिश शिंदे,इत्यादि
प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा स्वागत-सत्कार सोहळा संपन्न झाला. तद्नंतर या सत्कार सोहळ्याचे विषेश अतिथी मा.श्री.जयंतराव पाटील हे नियोजित कार्यक्रमा साठी रवाना झाले. अशी माहिती राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे पाटण शहर अध्यक्ष गणेश नायकवडी यांनी प्रसार माध्यमांना दिली.



















