सोलापूर(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०८.०७.२०२२
पंढरपूर- डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी संस्थेच्या वतीने बार्टीचे महासंचालक श्री धम्मज्योती गजभिये यांच्या संकल्पनेतून संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात प्रथमच संविधान दिंडीचा जागर करण्यात आला. ८ जुलैला संविधान दिंडी पंढरपूरात दाखल झाली सविधान दिंडीचे स्वागत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पंढरपूर येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केले. संविधान दिंडीचा समारोप डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन श्री.रामदास लोखंडे यांनी सामुहिक पणे केले. बार्टीचे प्रकल्प अधिकारी श्री.सचिन नांदेडकर यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांना भारतीय संविधानाची प्रत, व उद्देशिकेची प्रत भेट देऊन सन्मानित करण्यात आले.

श्रीमती साधनाताई भोसले नगराध्यक्षा पंढरपूर, डी सर्वगोड नगरसेवक, श्री सुनील सर्वगोड,माजी नगरसेवक, श्री मनोज सुर्वशे माजी नगरसेवक, ह.भ.प. शामसुंदर महाराज, संविधान प्रचारक, अॕड प्रणव परिचारक, यांनी संविधान दिंडीचे पंढरपूरकरांच्या वतीने स्वागत करून बार्टी संस्थेचे अभिनंदन केले. यावेळी श्री.भालचंद्र कांबळे, बहुजन समाज पार्टी जिल्हाध्यक्ष सोलापूर, प्रा.सुरेखा भालेराव, श्री संतोष पवार, शहराध्यक्ष रिपाई, ज्येष्ठ नेते जितेंद्र बनसोडे, श्री रवि शेवडे, ज्येष्ठ पत्रकार, श्री संतोष ननवरे, माजी उपसरपंच भंडीशेगाव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर वारकरी बांधव उपस्थित होते. लोकशाहिर जितेंद्र धाईजे, यांनी आपल्या प्रबोधनातून संविधानाचा जागर केला संविधान दिंडी समारोप कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समतादुत व बार्टी संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री.सचिन नांदेडकर, प्रकल्प अधिकारी, यांनी केले. सुत्रसंचलन श्री.रामदास लोखंडे यांनी केले तर आभार श्रीमती प्रणिता कांबळे यांनी मानले.



















