पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,कलिंदर शेख
दि.७.१०.१९
भोसरी- राष्ट्रवादी काँग्रेस आणि पुरस्कृत उमेदवारांसाठी राष्ट्रवादीचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या पिंपरी-चिंचवड शहरात सभा होणार होत्या. परंतु, त्यांच्या हेलिकॉप्टर उड्डाणाची परवानगी नाकारण्यात आल्याने पाईट, पिंपरी, चिंचवड आणि भोसरीतील सभा रद्द झाल्या आहेत.याबाबत खा.डॉ.अमोल कोल्हे यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात कोल्हेनी म्हटले आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात सभा आहे त्यामुळे हेलिकॉप्टर उड्डाणाची परवानगी नाकारण्यात आली आहे. परिणामी, पाईट, भोसरी, चिंचवड आणि पिंपरीच्या सभेला येऊ शकलो नाही. देशाचे पंतप्रधान एका पक्षाच्या राजकीय प्रचारासाठी येत असतील. तर, त्या ‘प्रोटोकॉल’मुळे इतर पक्षांना वंचित ठेवण्यात येत आहे. प्रचार करणे नाकारले जात आहे. हे कितपत लोकशाहीच्या तत्वाला आणि मुल्याला धरुन आहे. या विषयी संभ्रम निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.भोसरी- राष्ट्रवादी काँग्रेस आणि पुरस्कृत उमेदवारांसाठी राष्ट्रवादीचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या पिंपरी-चिंचवड शहरात सभा होणार होत्या. परंतु, त्यांच्या हेलिकॉप्टर उड्डाणाची परवानगी नाकारण्यात आल्याने पाईट, पिंपरी, चिंचवड आणि भोसरीतील सभा रद्द झाल्या आहेत.याबाबत खा.डॉ.अमोल कोल्हे यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात कोल्हेनी म्हटले आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात सभा आहे त्यामुळे हेलिकॉप्टर उड्डाणाची परवानगी नाकारण्यात आली आहे. परिणामी, पाईट, भोसरी, चिंचवड आणि पिंपरीच्या सभेला येऊ शकलो नाही. देशाचे पंतप्रधान एका पक्षाच्या राजकीय प्रचारासाठी येत असतील. तर, त्या ‘प्रोटोकॉल’मुळे इतर पक्षांना वंचित ठेवण्यात येत आहे. प्रचार करणे नाकारले जात आहे. हे कितपत लोकशाहीच्या तत्वाला आणि मुल्याला धरुन आहे. या विषयी संभ्रम निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.



















