पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,कलिंदर शेख
दि.२६.६.१९
काळेवाडी- फॅशन डिजाईनर महिलांना गेले अनेक दिवस प्रशिक्षण देण्यात येत होते. प्रत्येक महिला बचत गटातील महिलांना आज(दि.२५) रोजी मातोश्री ग्रूपचे संस्थापक अध्यक्ष गणेश आहेर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी महिला बचत गटाच्या प्रमुख व शिवसेना विभाग संघटिका भाग्यश्रीताई म्हस्के. यांच्या अध्यक्षतेखाली ह्या कार्यक्रमाचे आयोजन काळेवाडी येथे करण्यात आले. तसेच या वेळी शिवसेना मा विभागप्रमूख खंडू शिरसाठ, शिवसैनिक बाळासाहेब गायकवाड, विभागप्रमूख गोरख पाटील निलंगेकर, सामाजिक कार्यकर्ते रमेश शिंदे, या प्रशिक्षण मध्ये सौ.दिपाली अतुल पांडे,सौ किरण प्रकाश नाईक, सौ.श्वेता श्रीधर शिर्के, सौ वैशाली अभय कूलथे, सौ.दिपाली दिपक मोरे, सौ.रोहिणी योगेश सरोदे, सौ.जयश्री सूनिल देवकर,सौ.चैताली अमोल तांबोळकर,सौ.मनीषा अनिल मगर,सौ.रूपाली महेश धावरे,सौ.पूजा प्रकाश मोरे,यांना प्रमाणपत्र देण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.



















