सोलापुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,संतोष पवार
दि.२६.०६.१९
करमाळा- पोथरे येथील करमाळा जामखेड रोडवरील कान्होळा नदी पात्रावर असलेल्या पुलाच्या डागडुजीचे काम २ महिन्यापूर्वी करण्यात आले होते.पावसाळा सुरू व्हायच्या आतच सदर डागडुजी कामाची लगेचच पडझड सुरू झाली आहे.हे काम निकृष्ठ दर्जाचे झाले असून या कामाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सोशल मीडिया तालुका उपाध्यक्ष नितिनभाऊ झिंजाडे यांनी जिल्हाधिकारी साहेब सोलापूर यांच्याकडे केली आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की राज्यात व देशात निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे मोठी जीवित व वित्त हानी झाली आहे त्यामुळे शासनाने जुन्या पुलाच्या डागडुजीवर कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत.पण निकृष्ठ दर्जाच्या कामामुळं लोकांच्या जीविताचा प्रश्न उभा राहिला आहे.पोथरे येथील पूल २०० फूट लांबीपेक्षा जास्त आहे,या पुलावररून बीड,औरंगाबाद, जालना कडे जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते व कान्होळा नदीला खूप पाणी येते.अशात आशा प्रकारच्या निकृष्ट कामामुळे शासनाचा म्हणजे लोकांचा पैसा तर वाया गेलाच आहे.त्यामुळं या झालेल्या कामाची सखोल चौकशी होऊन ते काम पुन्हा मजबूत करण्यात यावे.निकृष्ठ कामामुळे या पुलावर काही अनुचित प्रकार घडल्यास याला सर्वस्वी शासन व संबधित ठेकेदार जबाबदार असेल.असेही सदर तक्रारीत म्हटले आहे.



















