पुणे( निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, आनंद मोरे
दि.२८/१२/१८
पिंपरी, एका दुचाकीवरुन चालेल्या दोघा मित्रांना आढवून दोघा जणांनी त्यांच्यावर कोयत्याने डोक्यात,पाठीत आणि हातावर सपासप वार करुन गंभीर जखमी केले. ही घटना गुरुवारी दि.२७ला रात्री उशीरा दीड वाजन्याच्या सुमारास पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयासमोर घडली.अमोल बसवराज वाल्हे वय २० व आप्पासाहेब अतुल कदम वय २० रा. दोघेही रा. पेठ क्रमांक २२, ओटास्कीम, निगडी असे जखमी दोघा मित्रांची नावे आहेत. याप्रकरणी त्यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अन्थोनी फ्रान्सीस वय २२ रा. पिंपरी आणि रॉबीन फ्रान्सीस वय २५ दोघेही रा. पिंपरी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री उशीरा दीडच्या सुमारास अमोल आणि त्याचा मित्र आप्पासाहेब हे दोघे त्यांची दुचाकी क्र.एमएच-१४-एफआर-५५५० वरुन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयासमोरील रस्त्यावरुन जात होते. यावेळी आरोपी अन्थोनी आणि रॉबीन हे त्यांच्या दुचाकी वरुन आले आणि त्यांनी त्यांची दुचाकी अमोल आणि आप्पासाहेब यांच्या दुचाकीच्या आडवी लावली. तसेच त्या दोघांवर कोयत्याने डोक्या, हातावर आणि पाठीवर वार केले आणि पसार झाले. या घटनेत ते दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.



















