सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,सुभाष जाधव
दि.२६.०९.१९
फलटण- शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहा महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.फलटण शहर पोलीस ठाणे गु.र.नं.७०/१९ भादवि कलम ३६४,३९५,३४ वगैरे मधील आरोपी नामे किशोर रामचंद्र आवारे रा. मंगळवार पेठ, फलटण हा गेले सहा महिन्यापासून फरारी होता.त्याच्याविरुद्ध सिआरपिसी क.८२ प्रमाणे जाहिरनामा काढण्यात आला होता.त्याला आॅलआउट आॅपरेशन दरम्यान मिळालेल्या बातमीवरुन ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे.सदर आरोपी डाॅ.संजय राऊत अपहरण गुन्हयामधील आहे.त्याने गुन्हा घडण्यापूर्वी सदर रोडची रेकी केली होती.हा ६ महिन्यापासून पोलीसांना गुंगारा देत होता.पोलीस उपनिरीक्षक बनकर व पोलीस उपनिरीक्षक देसाई व पोलीस काॅ.दत्तात्रय नाळे यांच्या पथकाने त्याला कोळकी रोडवर ताब्यात घेतले आहे.



















