सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, मनोज भोसले
दि.१७.०६.१९
फलटण- काही दिवसांपूर्वी देशामध्ये लोकसभा निवडणूका पार पडल्या. निवडणुकी दरम्यान काही मतदार संघात EVM मशीन मध्ये तांत्रिक अडचणी असल्याचं निदर्शनास आल आणि काही ठिकाणी पडलेल्या मतांमध्ये आणि मोजल्या गेलेल्या मतांमध्ये मोठी तफावत आढळून आली. त्यामुळं विरोधी पक्ष तसेच इतर संघटनांनी देशभरात ‘EVM हटावो देश बचाओ’ च्या घोषणा दिल्या तसेच महाराष्ट्रातही काही ठिकाणी याचे पडसाद उमटले.
महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळजनक क्रांती करणारे अँड. प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष या आंदोलनामध्ये जास्त सक्रिय आहे. फलटण सह अन्य ठिकाणी आज (दि.१७) रोजी व.ब.आ. च्या वतीने घंटा नाद आंदोलन छेडण्यात आले आहे व तहसील कार्यालयात मोर्चा काढून तहसीलदार यांना पुन्हा निवडणुका व्हाव्यात यासाठी निवेदन देण्यात आले.यावेळी फलटण येथील युवराज गायकवाड शहराध्यक्ष व. ब.आ. तसेच सातारा जिल्हाध्यक्ष शामराव काकडे, उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, जिल्हा सल्लागार सुखदेव शिंदे, अरविंद आढाव तालुकाध्यक्ष, महादेव गायकवाड तालुकाध्यक्ष, आर.पी.आय. तसेच सानी काकडे, शामराव अहिवळे तुकाराम गायकवाड हे उपस्थित होते.
◆ EVM हटाओ, बँलेट पेपर लाओ.- ऍड. प्रकाश आंबेडकर
भारत हा जगात सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. भारतीय लोकशाही सर्वश्रेष्ठ मानली जाते.जगात लोकशाही स्वीकारणाऱ्या जवळ जवळ सर्वच देशांनी ई. व्ही. एम. मशिनद्वारे निवडणुका नाकारल्या आहेत. परंतू भारतीय वंचित बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रस्थापित सरकारने ई. व्ही. एम. चा स्वीकार केला आहे. येणाऱ्या आगामी विधानसभा, पंचायत समिती नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत या सर्व प्रकारच्या निवडणूका बँलेट पेपर च्या साह्याने घ्याव्यात अशी मागणी विरोधी पक्षासह वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसेच तसे न केल्यास देशभर आंदोलन उभारण्याचे संकेत दिले आहेत.



















