रायगड(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, अमित साहू
दि.०९.०९.२०२२
उरण- फुंडे येथील महाविद्यालयात गुरुवारी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त महाविद्यालयातील डॉ एम सी सोनवणे, हिंदी विभागप्रमुख डॉ. झेलम झेंडे, डॉ. सुजाता पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य डॉ. पी. जी. पवार यांनी मार्गदर्शन करताना शिक्षक, शिक्षक प्रणाली, शिक्षकाची अभ्यासाप्रती असणारी निष्ठा यावर भाष्य केले. शिक्षक हा नेहमी शिस्तप्रिय, सावध, दक्ष, बहुआयामी व्यक्तिमत्व असला पाहिजे. शिक्षक हा प्रयोगशील असावा, संशोधनाची आवड आणि ध्यास असावा, शिक्षकाने स्वतः ला अद्यावत ठेवायला पाहिजे. शिक्षक हा नवनिर्माता नवलिया असावा, असे मत व्यक्त केले कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. विलास महाले उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. राम गोसावी यांनी केले. प्रा. चिंतामण धिंदळे यांनी आभार मानले.



















