सोलापुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०८.०६.२०२०
करमाळा- बनावट खत निर्मिती व विक्री करणाऱ्या रॅकेटची सिआयडी मार्फत चौकशी करा अशी मागणी राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन झिंजाडे यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.अलीकडेच करमाळा येथील खत विक्री करणाऱ्या दुकानात बनावट पोटॅश खत विक्री करणारे रॅकेट पकडले गेले असून याच प्रकारची करवाई मोहोळ तालुक्यात ही झालेली आहे.ही सर्व परिस्थिती पाहता हे रॅकेट महाराष्ट्रभर कार्यरत असावे. दरवर्षी हजारो मेट्रिक टन शेतकरी खत वापरत असतात.बनावट खतामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान व तितकेच उत्पन्न बुडाले आहे तसेच शासनचा मोठा महसूल बुडाला आहे. एकाच वेळी शासन व शेतकरी यांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे सदर बनावट खत निर्मिती व विक्री करणाऱ्या रॅकेटची, यामध्ये सहभागी असणाऱ्या प्रत्येक घटकाची सीआयडी मार्फत चौकशी होऊन कारवाई करावी. शेतकऱ्यांच व शासनच झालेलं नुकसान सदर लोकांकडून वसूल करण्यात याव अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती अर्थमंत्र्यांनी अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख,कृषिमंत्री दादाजी भुसे,युवक राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अभिषेक बोके याना पाठवण्यात आल्या आहेत.



















