पिंपरी(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२५.०८.२०२२
पिंपरी- बालाजीनगर मध्ये सक्सेस कोचिंग क्लासेस मुलांनी मुलांनी महागाई, भ्रष्टाचार विरोधी कार्टून बनवून वेगळा उपक्रम राबविला व समाजाला आपल्या समस्याची जाणीव करून दिली.दहीहंडीच्या माध्यमातून जनतेच्या निदर्शनास आणून दिले की महागाई किती पटीने वाढली, दहातोंडी रावण कसा महिलांचा शोषण करत आहे, महागाई, गरिबी, भ्रष्टाचार, ईडीचा वापर करून हिंदू मुस्लिम, जातीवाद करून जनतेच्या प्रश्नांची गिळंकृत करत आहे महागाईचा अजगर सामान्य नागरिकांना तेल, पेट्रोल, आटा, डाळ दैनंदिन वस्तूंना महाग केले आहे. आणि जनतेची पिळवणूक अशा विविध प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी क्लासेसचे संस्थापक फिरोज तांबोळी व वेल्फेअर पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सालारभाई शेख यांनी पुढाकार घेवून मुलांचे मनोबल वाढवले.



















