मुंबई (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
मुंबई : दि.१५.०८.१८ नाहूर,मुंबई येथील राजगृह बुद्ध विहारामध्ये बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुपची मिटिंग दि.१२.०८.१८रोजी आयोजित करण्यात आली होती.या मिटिंगसाठी मुंबई,ठाणे,पुणे,अकोला, महाबळेश्वर या वेगवेगळ्या विभागातून संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.या मिटिंगचे आयोजन हर्षवर्धन गंभीरे अध्यक्ष मुंबई,भारत साळवे अध्यक्ष ठाणे व अनिल जाधव अध्यक्ष पालघर यांनी संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे यांचे अध्यक्षतेखाली केले होते.या मिटींगला सर्वानी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.यावेळी किरण शिंदे,हर्षवर्धन गंभीरे,भारत साळवे,अनिल जाधव,सुहास शिंदे ,ऍड. रजनी आगळे,विजेंद्र गायकवाड,सुमित गायकवाड यांनी आपली मते मांडली व उपस्थितांना मार्गदर्शन केले.किरण शिंदे यांनी आजचा भारत व बाबासाहेबांना अपेक्षित भारत यातील फरक सांगताना बाबासाहेबांना अपेक्षित भारत साकार करण्यासाठी आपल्या संघटनेचा पदाधिकारी कसा असावा,त्याचे व्यक्तिमत्व विकास व वक्तृत्व कला या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच संघटनेच्या पदाधिकारी यांचा ड्रेसकोड सफेद शर्ट,काळी पॅन्ट व आकर्षक टाय याप्रमाणे ठरविण्यात आला.आजच्या मिटिंगचे आकर्षण म्हणजे फॉर्मल कपड्यांवर परीधान केलेली टाय असा पेहराव केलेल्या तरुणांची लक्षणीय संख्या हेच होते.संघटनेची पुढील धोरणे याबाबत देखिल सविस्तर चर्चा करण्यात आली.संजीवन सोनावणे व वेदांत मोरे यांनी यावेळी आपल्या सुंदर आवाजात बाबासाहेबांवरील गीत सादर केले.या मीटिंगमध्ये आम्ही आंबेडकरवादी संघटनेचे बुद्धभूषण शिंदे व रोहित कांबळे यांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली.महिला आघाडी बळकट करण्याच्या दृष्टीने देखील विशेष कार्यक्रम ठरविण्यात आला.सूत्र संचालन सुहास शिंदे(उपाध्यक्ष मुंबई)यांनी केले. या प्रसंगी किरण शिंदे (संस्थापक अध्यक्ष),सुमित गायकवाड,विकास ओव्हाळ,नंदकुमार जोगदंड, अजय शिंदे,ऍड.रजनी आगळे,संघमित्रा गंभिरे,हर्षवर्धन गंभिरे (अध्यक्ष मुंबई)सुहास शिंदे (उपाध्यक्ष मुंबई),भारत साळवे (अध्यक्ष ठाणे),अनिल जाधव (अध्यक्ष पालघर),सूचित सावंत, अंकुश जाधव, सुरेश जाधव,विकास मस्के,रितेश मस्के, प्रथमेश कदम, प्रशांत साबळे,वेदांत मोरे,दिपक गायकवाड,अनिल मगरे, विजेंद्र गायकवाड,संजीवन सोनवणे,संतोष सोनवणे,सूर्यकांत साळवी,पंकज कदम,विवेक नाईक,सागर गांगुर्डे,राहुल बैसाने
यांचेसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.



















