भाजपा अनु.जाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी अँड.वाल्मीक (तात्या) निकाळजे यांची फेर नियुक्ती..
बीड(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२८.०८.२०२०
आष्टी- राज्याचे जेष्ठ मानवी हक्क कार्यकर्ते राज्यातील दलित , आदिवासी, भटके विमुक्तांचे नेते व शोषितांचा खरा आधारस्तंभ अड. वाल्मीक (तात्या) निकाळजे यांची भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी नुकतीच फेर नियुक्ती करण्यात आली. त्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की , भाजपाच्या दर तीन वर्षांनी निवडणूका होतात, त्यात पार्टीच्या सर्व आघाड्यांच्या निवडणुका होऊन नियुक्त्या केल्या जातात. नुकत्याच झालेल्या पार्टी निवडणूकीनुसार भाजपा अनुसूचित जाती मोर्चाची राज्य कार्यकारणी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मा. आ.सुधाकर भालेराव व प्रदेश महामंत्री मा . रविंद्र चव्हाण यांनी नुकतीच जाहीर केली असून अॅड. वाल्मीक (तात्या) निकाळजे यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी फेर नियुक्ती केली आहे. या फेर नियुक्ती बाबत अॅड. वाल्मीक (तात्या) निकाळजे यांनी भाजपा चे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत (दादा) पाटील, महाराष्ट्र राज्याचे संघटन मंत्री विजयराव पुराणीक, माजी मुख्यमंत्री तथा विधान परिषदचे विरोधी पक्ष नेते ना. देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, राज्याच्या लोकनेत्या तथा माजी मंत्री पंकजाताई मुंडे, प्रदेश उपाध्यक्ष खासदार डॉ. प्रितम ताई मुंडे- खाडे, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आ.सुधाकर भालेराव, राज्याचे जेष्ठ नेते आ. विजय गिरकर, मोर्चाचे माजी प्रदेश अध्यक्ष सुभाष पारधी , पार्टीचे पॅनॅलिस्ट प्रतिनिधी माजी मंत्री आमदार सुरेश (अण्णा) धस, पार्टीचे राज्य कार्यकारणी निमंत्रीत सदस्य आ.भिमरावजी धोंडे, आमदार (अण्णा) पवार, राज्य कार्यकारणी सदस्य तथा माजी जिल्हा अध्यक्ष रमेश पोकळे, जिल्हा अध्यक्ष राजेंद्रजी म्हस्के , ओबीसी मोर्चाचे प्रदेश चिटणीस शरद राठोड यांचे अॅड . वाल्मीक (तात्या) निकाळजे यांनी मन : पूर्वक आभार मानले असून सर्वानी अॅड. वाल्मीक (तात्या) निकाळजे नियुक्ती बद्दल अभिनंदन केले असून हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत . विश्वासात अधिक पात्र ठरण्याचा आणि सर्व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व सर्वाच्या सहकार्याने शोषित समाजास जास्तीत जास्त न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करील असे अभिवचन अॅड.वाल्मीक (तात्या) निकाळजे यांनी दिले आहे . प्रजासत्ताक पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुरेश गायकवाड (नांदेड), संपादक विलास वाघमारे, माजी नगर सेवक, गौतम लांडगे (औरंगाबाद), प्रा. मधुकर कांबळे, नगरसेवक अजित बनसोडे सोलापुर, राज्य कार्यकरणी सदस्य बबन झांबरे, मा.सभापती अॅड. साहेबराव म्हस्के, अ.भा. अधिवक्ता परिषदेचे प्रदेश महामंत्री अॅड. बाबुराव अनारसे, मच्छिंद्रनाथ मल्टीस्टेट पतसंस्थेचे चेअरमन नामदेव राऊत , नगराध्यक्ष भारत मुरकुटे, शामराव ससाणे, बाळासाहेब पवार (मुंबई), कैलास जोगदंड पुणे, अॅड.संग्राम गळगटे, अॅड . रत्नदिप निकाळजे (नोटरी भारत सरकार), अॅड. सतिषकुमार गायकवाड (नोटरी भारत सरकार), अॅड.अविनाश निंबाळकर, मल्हारी जाधव सर , प्रा. डॉ. हरिदार विधाते, प्रा. शिवाजी वनवे सर, मुख्याध्यापक बाबासाहेब गिऱ्हे, मुख्याध्यापक सुनिल शिंदे सर, विकीभाऊ सदाफुले (जामखेड), तालुकाध्यक्ष हनुमंत थोरवे, जिल्हा सरचिटणीस शंकर देशमुख, दादासाहेब जगताप सर, तालुकाध्यक्ष राजपाल शेंडगे (पाटोदा), आरपी तालुकाध्यक्ष अशोक साळवे , माजी उपसभापती अरुण (भैय्या) निकाळजे, उपसभापती रमेश तांदळे, महेंद्र जगताप, अभिमन्यु शिंदे, प्रा.राहुल निकाळजे तसेच विविध वकील संघाचे सदस्य इत्यादीसह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले असून हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. बीड, अहमदनगर, सोलापूर, नांदेड, औरंगाबाद, पुणे, मुंबई यासह राज्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा प्रचंड वर्षाव होत आहे.



















