सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.१३.०९.२०२०
महाबळेश्वर- हॉटेल अनुपम येथे महाबळेश्वर नगरपालिकेच्या १३ नगरसेवकांच्या वतीने ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मशीन उपनगराध्य अफजलभाई सुतार यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व सहकारी नगरसेवकांच्या साक्षीने नागरिकांच्या सेवेत डोनेट करण्यात आले.ज्या नागरिकांना ऑक्सिजन संबंधित त्रास जाणवत असेल त्यांनी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा त्यांना या मशीनचा लाभ विनामूल्य घेता येईल.असे आवाहन उद्योजक संतोष पार्टे यांच्या वतीने करण्यात आले आहे.तर आम्ही १३ नगरसेवक नेहमी शहरवासीयांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहोत कोविडच्या काळात जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्यांनी आमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नयेत.टीकाकारांनी एकदा आरशात चेहरा पाहिल्यास सत्य समजेल अशी प्रतिक्रिया उपस्थित नगरसेवकांनी व्यक्त केली आहे.तर शहराच्या विकासासाठी या १३ नगरसेवकांच्या कायम सोबत असल्याचे समाजसेवक किरण गोरखनाथ शिंदे यांनी म्हटले असून या उपक्रमाचे स्वागत केले आहे.आम्ही बोलत नाही तर करून दाखवतो अशी प्रतिक्रिया अफजलभाई सुतार यांनी व्यक्त केली असून येत्या काळात शहरवासीयांच्या अडचणी प्राधान्याने सोडविण्यासाठी कटिबद्ध आहोत असे म्हटले आहे.या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष अफजलभाई सुतार, नगरसेवक नासिरभाई मुलाणी, नगरसेवक संदीप भाऊ साळुंखे,नगरसेवक प्रकाश पाटील, नगरसेवक रविंद्र कुंभारदरे,समाजसेवक किरण शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष दत्ताभाऊ वाडकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष रोहित ढेबे पक्षाचे जेष्ठ नेते तोफिकभाई पटवेकर,संदीप मोरे,उमेश रोकडे, दिनेश बिरामणे सुनिल चोरगे, रमेश शिंदे यांचेसह मान्यवर उपस्थित होते.



















