सातारा(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०६.१२.२०२१
महाबळेश्वर- रोजी येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे असलेल्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास तालुक्यातील समस्त जनतेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. प्रथमतः बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप,महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व जयंती उत्सव समिती अध्यक्ष किरण गोरखनाथ शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.तालुका जयंती उत्सव समितीच्या वतीने किरण शिंदे, किसननाना सपकाळ, अमोल काकडे, गौरव काकडे, गोरखनाथ शिंदे यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.त्यानंतर भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला.शिवसेना माजी जिल्हा प्रमुख व जिल्हा नियोजन समिती सदस्य बंडूशेठ कुंभारदरे, अर्बन को. ऑप. बँक महाबळेश्वरचे चेअरमन सचिन धोत्रे, संचालक नंदकुमार वायदंडे, बाबुदादा कात्रट, जावेद वलगे,बाळासाहेब कोंढाळकर, मुख्य व्यवस्थापक फकीर वलगे यांच्या वतीने बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या वतीने माजी उपनगराध्यक्षा छायाताई शिंदे,अनिता मोरे, सुनंदा रोकडे, अरुणा काकडे, पुष्पा सपकाळ,श्वेता मोरे यांनी पुष्पहार अर्पण केला. बी एस यादव, यादव गुरुजी, उत्तम भालेराव, किसन सपकाळ, संतोष भालेराव, यांनी दीप प्रज्वलन केले.या प्रसंगी सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. उपस्थितांनी बाबासाहेबांना पुष्पांजली अर्पण केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी साधेपणाने व कोविडच्या नियमांचे पालन करून सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. धम्मपालन गाथा पठण करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. या अभिवादन कार्यक्रमासाठी बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप, महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे, माजी शिवसेना जिल्हा प्रमुख व सातारा जिल्हा नियोजन समिती सदस्य बंडूशेठ कुंभारदरे,अर्बन बँक चेअरमन सचिन धोत्रे, संचालक नंदकुमार वायदंडे, बाबुदादा कात्रट, जावेद वलगे,बाळासाहेब कोंढाळकर, मुख्य व्यवस्थापक फकीर वलगे, माजी उपनगराध्यक्षा छायाताई शिंदे, उत्तम भालेराव, किसन सपकाळ, संतोष भालेराव, बी एस यादव, यादव गुरुजी, अमोल कांबळे, श्वेता मोरे,अनिता मोरे, सुनंदा रोकडे,सागर मोरे, मनोज मोरे राजू सोंडकर,यांचेसह मोठ्या संख्येने भीमसैनिक व नागरिक उपस्थित होते.



















