सातारा(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, दि.१०.१०.२०२३
महाबळेश्वर- येथील जगप्रसिध्द केट्स पॉइंट या पर्यटन स्थळावरून धाराशिव येथील विवाहित महिला तोल जाऊन १२०० फूट खोल दरीत कोसळली त्यामध्ये तीचा जागीच मृत्यू झाला. महिलेचे नाव अंकिता गुरव असून वय २५ वर्षे आहे. तीचे १० महिन्यापूर्वी लग्न झाले होते. ती आपल्या पतीसोबत फिरायला येथे आली असताना फोटो काढताना तीचा तोल जाऊन ती दरीत कोसळल्याची माहिती तीच्या पतीने दीली आहे.सदर घटना सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली.सह्याद्री ट्रेकर्स,महाबळेश्वर ट्रेकर्स, पोलीस प्रशासन, वनविभाग, महाबळेश्वर नपा, स्थानिक नागरिक यांच्या वतीने मदतकार्य तात्काळ चालू करण्यात आले. सायंकाळी ७ वाजता वरील सर्वांच्या अथक प्रयत्नाने सदर महिलेचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला असून शवविच्छेदनासाठी पांचगणी ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आला असून पुढील तपास पांचगणी पोलिस करत आहेत.



















