सातारा(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.२.१.२०२०
मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत
आज पोलिस प्रशिक्षण केंद्र, मरोळ येथे महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन संचलन समारंभ पार पडला.
यावेळी त्यांनी महाराष्ट्र पोलिस दलाशी संवाद साधला. पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल जी यावेळी उपस्थित होते.
त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या वतीने मुंबई पोलिस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी मरोळ येथे बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन केले.
🔹या प्रकल्पात
प्रशासकीय इमारत, विश्रांतीगृह,
वसतीगृह, क्रीडासंकुल आणि
सर्व सुविधायुक्त ४४८ सदनिकांचे बांधकाम करण्यात येणार आहे.
यात तळमजल्यासह सात मजल्यांच्या सोळा इमारतींचा समावेश असणार आहे.
🔹पोलिस नेहमीच तणावात असतात, त्यामुळे नववर्षात त्यांना तणावमुक्त करण्याची जबाबदारी शासन घेईल असे सांगून मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी पोलिसांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.



















