सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२४.०१.२०२०
पाटण- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पाटण तालुकाध्यक्षपदी दिपक माने तसेच उपाध्यक्षपदी अरुण गुरव, पांडुरंग लोहार, तालुका संपर्क म्हणून बाबासो सुतार यांची सर्वानूमते निवड करण्यात आली. तसेच अन्य पदाधिकाऱ्यांच्या निवडी यावेळी करण्यात आल्या. संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष प्रवीण कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी संपन्न झाल्या.
राज्यभरातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,मुंबई ही संघटना अग्रेसर आहे. संघटनेचे राज्यसंघटक संजयजी भोकरे साहेब, प्रदेशाध्यक्ष वसंतरावजी मुंढे साहेब, राज्यसरचिटणीस विश्वासजी आरोटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात संघटनेचे आदर्शवत काम सुरू आहे. सातारा जिल्ह्यातील पत्रकारांसाठी संघटना कार्यरत असून त्या अनुषंगाने पाटण तालुका कार्यकरणीची घोषणा आज करण्यात आली. शासकीय विश्रामग्रह पाटण येथे झालेल्या बैठकीदरम्यान जिल्हाध्यक्ष प्रवीण कांबळे, इलेक्ट्रॉनिक मिडिया जिल्हाध्यक्ष विकास भोसले, जिल्हा सल्लागार उमेश सुतार यांच्या उपस्थितीत पदाधिकारी निवडी करुन निवड पत्रे देण्यात आली. यामध्ये साप्ताहिक निर्भीड पत्रकारचे दिपक माने यांची पाटण तालुकाध्यक्षपदी, तसेच उपाध्यक्षपदी दै.सकाळचे अरुण गुरव, साप्ताहिक निर्भीड पत्रकारचे पांडुरंग लोहार, सचिवपदी हॅलो साताराचे अनिल माने, सहसचिवपदी हॅलो साताराचे चंद्रकांत सुतार, कार्याध्यक्षपदी दै.प्रीतिसंगमचे विकास कदम, संपर्क प्रमुखपदी जनमतचे बाबासो सुतार, सल्लागारपदी जेष्ठ पत्रकार विजय थोरवडे, संतोष खालकर (तरुण भारत), समन्वयक संजय डुबल (सत्य सह्याद्री) यांची निवड करण्यात आली.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या तत्वप्रणालीला अनुसरून सदर कार्यकारणीची असणारी जबाबदारी व पदाधिकाऱ्यांची मूलभूत कर्तव्ये पार पाडण्याची जबाबदारी या विषयावर जिल्हाध्यक्ष प्रविण कांबळे यांनी मार्गदर्शन करुन संघटनेच्या ध्येय धोरणा विषयी माहिती दिली. उमेश सुतार यांनी पत्रकारांची काम करण्याची पद्दत कशी असावी, सलोखा कसा असावा या विषयी मार्गदर्शन केले. विकास भोसले यांनी पत्रकार म्हणून काम करत असताना पत्रकारांना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय यावर मार्गदर्शन केले.
नुतन अध्यक्ष दिपक माने यांनी पाटण तालुक्यातील पत्रकारांची एकजूट करुन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या ध्येय धोरणानुसार कार्यरत राहणार असल्याचे सांगितले. यावेळी दिपक मांडवकर (दै.लक्ष्मीपुत्र), महेश मुळे (मुक्त पत्रकार), विठ्ठल कळके (मराठा वेब, युट्यूब पोर्टल), किशोर गुरव (दै.मुक्तागिरी), गणेश नायकवडी (निर्भिड पत्रकार साप्ताहिक), नितीन खरात (हॅलो सातारा), अमोल चव्हाण (दै.प्रभात), सागर जाधव व पत्रकार उपस्थित होते. अरुण गुरव यांनी आभार मानले.
फोटो –



















