मुंबई(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, संदीप पतांगे
दि.२८.०८.२०२२
वाशिंद- वाशिंद मधील सावरकर नगर रोडच्या बाजूला असलेल्या विजय विल्ला अपार्टमेंट, साहिल दुचाकी पार्किंग समोर वासिंद रेल्वे स्टेशन च्या संरक्षक भिंतीला असलेला ट्रान्समीटरची डीपी. ही बऱ्याच महिन्यापासून उघड्या अवस्थेत आहे. पत्रा पेटीचे दरवाजे हे तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे तेथून ये-जा करणाऱ्या शाळकरी मुलांना तसेच नागरिकांना त्या पासून मोठा धोका उद्भवलेला आहे. सावरकर नगर रोड वासिंद हा मुख्य रस्ता असल्याकारणाने या रस्त्यावर शाळकरी मुले, नागरिक व वाहनांची मोठी वर्दळ असते त्यामुळे या उघड्या डिपीच्या शेजारून जातांना नागरीक व मुले जीव मुठीत घेऊन प्रवास करत असतात. महावितरणच्या वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे नागरिकांनी तक्रार देऊन देखील याकडे गेंड्याच्या कातडी प्रमाणे सुस्तावलेल्या महावितरण प्रशासनाकडून लक्ष दिले जात नाही असा स्थानिंकांचा आरोप आहे. या सावरकर नगर रोड वरून शारदा विद्यालय वासिंद, जे.एस.डब्लू स्कूल ,न्यू आयडियल स्कूल ,स्वामी विवेकानंद स्कूल तसेच अन्य काही शाळा. या शाळांमध्ये नर्सरी पासून शालेय शिक्षण दिले जाते. त्यामुळे विशेषतः लहान विद्यार्थी या रस्त्यावरून ये-जा करतात. वासिंद शहर परिसरातील अन्य ठिकाणचे डीपीचे दरवाजे ही अश्याच प्रकारे खुल्या अवस्थेत आढळून येतात. त्यामुळे सोलंकी अपार्टमेंट, विजय विल्ला अपार्टमेंट व परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे कि, यापासून आमच्या मुलांच्या जीवाला धोका आहे , यावर महावितरण प्रशासनाने तात्काळ निर्णय घेऊन दुरुस्ती करण्यात यावी. अशी नगरिंकाकडून तीव्र मागणी होत आहे.



















