सोलापूर (निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२५.०६.१९
राज्यात अनुसूचित जातीतील बचत गटांना मिनी ट्रॅक्टर ची योजना चालू आहे या योजनेअंतर्गत ९० टक्के अनुदान म्हणजे तीन लाख पंधरा हजार रुपये इतके अनुदान दिले जाते, हे अनुदान दुप्पट म्हणजे सहा लाख तीस हजार रुपये केल्यास बचत गटांना मोठे ट्रॅक्टर घेता येतील व बचत गटांची आर्थिक उन्नती होईल व अनुसूचित जातीसाठी असणारा अर्थसंकल्पीत निधी वापरात येईल व तो अखर्चित राहणार नाही ही योजना स्वयंसहाय्यता बचतगटांऐवजी प्रत्येकी व्यक्तींना लागू करण्यात यावी तसेच ही योजना अनुसूचित जातीं सह इतर मागासवर्गीयांना ओबीसी,भटक्या विमुक्त जाती अल्पसंख्यांक,प्रवर्गातील व्यक्तींना शेतकऱ्यांना कामगारांना सबळ बनविण्यासाठी त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व्यक्तींना किंवा बचत गटांना शंभर टक्के अनुदानावर ट्रॅक्टर ची योजना लागू करावी.ओबीसी प्रवर्गातील जनता अतिशय गरीब आहे जोपर्यंत त्यांचे जीवनमान उंचावणार नाही तोपर्यंत भारत देश महासत्ता होणार नाही भारत देशाला महासत्ता होण्यासाठी इतर मागासवर्गीयांना ओबीसी भटक्या विमुक्त जाती अल्पसंख्यांक प्रवर्गातील जनतेला शासनाच्या विविध योजना देऊन त्यांना सदन करणे त्यांचे जीवनमान उंचावणे हे शासनाचे कर्तव्य आहे त्यामुळे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने त्यांच्या अंतर्गत अनुसूचित जातीच्या व्यक्तींच्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टर देण्याची योजना आहे त्याच धर्तीवर ओबीसी मंत्रालयाने अल्पसंख्यांक विकास विभागाने ओबीसी,भटक्या विमुक्त जाती अल्पसंख्यांक इतर मागासवर्गीयांना १००%अनुदानावर मोठे ट्रॅक्टर देण्याची योजना लागू करावी या योजनेसाठी इतर मागासवर्गीयांच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात यावी अशी मागणी निवेदना द्वारे केली आहे.
निवेदनाद्वारे दिलेल्या मागण्या मान्य न केल्यास नॅशनल दलित मुमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेच्या वतीने आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याकार्यालयासमोर दिनांक १० जुलै २०१९ रोजी आमरण उपोषणास बसणार आहे असे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग मंत्रालय मुंबई,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांना देण्यात आले आहे त्या वेळी उपस्थित राष्ट्रीय दलित न्याय आंदोलन संघटनेचे राज्य सचिव वैभव तानाजी गिते,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय नारायण झेंडे पश्चिम महाराष्ट्र सचिव बाबासाहेब विक्रम सोनवणे, सोलापूर जिल्हा सहसचिव पंकज काटे यांच्या सह सर्व कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती नॅशनल दलित मुमेंट फॉर जस्टिसचे सोलापूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अनिरुद्ध गायकवाड यांनी निर्भिड पत्रकार प्रतिनिधींशी बोलताना दिली.



















