सोलापुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१६.०६.२०२०
◆ माळशिरस तालुक्यातील मागासवर्गीय अत्याचारांबाबत प्रांताधिकारी उदासीन व मग्रूर असल्याची वंचितची टीका
माळशिरस- राज्यातील मागासवर्गीय, बौद्ध, भटक्यांवरील अत्याचार दिवसेंन दिवस वाढतच चालला आहे या अत्याचारांचा जाब सरकारला विचारण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडी माळशिरस तालुक्याच्या वतीने प्रांताधिकारी तथा दंडाधिकारी उपविभागीय कार्यालय माळशिरस व तहसील कार्यालय माळशिरस याठिकाणी निवेदन देण्यात आले.
यावेळी माळशिरस तालुक्यात सुद्धा अत्याचारांच्या घटना या कालावधीत घडलेल्या असून त्याबाबत माळशिरस तालुका उपविभागीय दक्षता व समन्वय समिती अध्यक्ष म्हणून प्रांताधिकारी यांनी यांत लक्ष घालणे, पीडित कुटुंबियांच्या घरी भेट देणे अॕट्रोसिटी अॕक्ट १९८९ व सुधारीत २०१५ नुसार गरजेचे असताना या गोष्टी अजूनही झाल्या नाहीत म्हणून पीडितांना सोबत घेऊन वंचितच्या कार्यकर्त्यांनी प्रांताधिकारी यांना चर्चेसाठी वेळ मागितला असता त्यांनी “तुमच्यासारखे शंभर लोक थांबलेत; तुम्हाला बोलायला वेळ नाही” असे बेजबाबदार व मगृरीचे उत्तर दिले. यांतून माळशिरस तालुक्यातील अत्याचारग्रस्तांच्या संदर्भात मग्रुरी व बुरसटलेल्या विचाराचे आहेत व जबाबदार अधिकाऱ्याचे हे वर्तन निंदनीय असल्याची खंत यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. यामुळे आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी याबाबत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
आता पिडित कुटूंबाकडे जर प्रशासनानेच जर पाठ फिरवली तर त्यांनी न्याय कोनाकडे मागायचा
यावेळी अकलूजमधील पीडित वाघमारे कुटुंबाचे वडील व चुलते यांसह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



















