पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२०.०६.१९
पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहराचे माजी उपमहापौर शेषाप्पा चंद्रप्पा नाटेकर (वय 68 वर्ष) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज (गुरुवारी) थेरगाव येथील खासगी रुग्णालयात निधन झाले.शेषाप्पा नाटेकर हे १९९२ साली पहिल्यांदा अपक्ष नगरसेवक म्हणून महापालिकेत निवडून आले होते. त्यानंतर पहिल्याच वर्षी उपमहापौर पद भूषविण्याचा मान त्यांना मिळाला होता.एकूण तीन वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. ‘क’ प्रभागाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले,सहा विवाहित मुली,सुना,जावई,नातू,पणतू असा परिवार आहे.माजी नगरसेविका सुखदेवी नाटेकर यांचे ते वडील होत.त्यांचा अंत्यविधी उद्या (शुक्रवारी) सकाळी ११ वा.अॅटोक्लस्टर शेजारील स्मशानभूमित होणार आहेजी उपमहापौर शेषाप्पा नाटेकर यांचे निधन



















