निर्भिड पत्रकार
बीड.
प्रतिनिधी,अमोल पवार
दिनांक.१२/०६/२०१८
विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अशोक जगदाळे यांच्याविरुद्ध आश्चर्यकारकरित्या विजय मिळवल्यानंतर भाजपाचे विजयी उमेदवार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना खोचक टोला लगावला. तुमचा आजचा विजय धनंजय मुंडेंना दिलेला धक्का आहे का, असा प्रश्न त्यांना प्रसारमाध्यमांकडून विचारण्यात आला. त्यावेळी धस यांनी ‘बाप बाप होता है, बेटा बेटा होता है’, असे विधान करत धनंजय यांना अप्रत्यक्षपणे खोचक टोला लगावला.या निवडणुकीत मला ‘घड्याळ’ असलेल्या अनेक हातांनी मदत केली. राष्ट्रवादी राष्ट्रवादीने मतांसाठी अनेक नगरसेवकांना स्मार्ट वॉच, किचेन, आयफोन वाटले होते. तरीही त्यांचा पराभव झाला. त्यामुळे आजचा विजय म्हणजे जनशक्तीने धनशक्तीवर मिळवलेला विजय आहे, असे धस यांनी म्हटले.या निवडणुकीत १००५ मतदारांपैकी १००४ मतदारांनी मतदानात भाग घेतला होता. यापैकी ५२७ मतदार काँग्रेस-राष्ट्रवादीचे होते. तर भाजपाकडे तब्बल १०० मते कमी होती. मात्र, तरीही मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेरीपासूनच सुरेश धस यांनी आश्चर्यकारकरित्या आघाडी घेतली व ती शेवटपर्यंत आणखी वाढवत नेली. त्यांना एकूण ५२६ मते मिळाली तर राष्ट्रवादीच्या अशोक जगदाळेंना ४५२ मते मिळाली. याशिवाय, २५ मते तांत्रिक कारणामुळे बाद ठरवण्यात आली. याशिवाय, एकाने मतदाराने नोटासाठी मतदान केले.



















