वर्धा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१६.०६.१९
आर्वी- आजही जातिवाद कायम असून मंदिरात खेळायला का गेला म्हणून एका दलित मातंग समाजाच्या ८ वर्षीच्या चिमुकल्या मुलाला त्याचा पॅण्ट काढून त्याला रखरखत्या उन्हा गरम झालेल्या स्टाईलवर बसवून त्याला जबर मारहाण करण्यात आली स्टाईलवर बसवल्याने मुलाच्या मागील बाजूस गंभीर इजा झाली असून ही घटना वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे घडली.
या प्रकरणी एका आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून या घटनेने दलित संघटना आक्रमक झालेल्या आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली यात आरोपीस रात्रीच अटक करण्यात आली आहे. लक्ष्मीबाई वार्ड आर्वी जि. वर्धा या ८ वर्षीय चिमुकला दलित मुलगा तो आपल्या वस्तीतील जोगणा मंदिरात खेळायला गेला होता मात्र याच परिसरात राहणाऱ्या आरोपी उमेश उर्फ अमोल ढोरे या इसमाने चिमुकल्या दलित मुलाला हटवले व मंदिरात चोरीचा संशय घेतला व मुलाला आरोपीने जबर मारहाण करत त्याचा पॅन्ट काढत त्याला भर उन्हात गरम झालेल्या स्टाईलवर बसवले यात गरम स्टाईलले मुलाच्या मागील बाजूस गंभीर इजा झाली.
आरोपीला मुलाच्या आईने हटकले असता मुलाच्या आईला सुद्धा आरोपीने शिवीगाळ केली. या प्रकरणी मुलाच्या वडील गजानन मधुकर खडसे वय ३२ वर्ष रा. आर्वी यांनी आर्वी पोलीस ठाण्यात घटनेची फिर्याद दाखल केली असून या प्रकरणी आरोपी उमेश ढोरे याच्या विरुद्ध पोलिसांनी कलम ३२६, ३४२, ५०४ व भादवी अनुसुचित जाती जमाती कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. मात्र या घटनेने समाज मन ढवळून निघाले असून या घटनेचा दलित समाजाने निषेध केला आहे.



















