पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,कलिंदर शेख
दि.२८.०६.१९
भोसरी- संत एकनाथ महाराजांची समाधी असलेल्या गावात एक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण आहे जिथे हिंदू मुस्लिम समाजातील एकोपा आणि सलोखा बघायला मिळतो.
अल्ला देवे अल्ला दिलावे ! अल्ला दवा अल्ला खेलावे!!
अल्ला बगर नही कोये! अल्ला करे सो ही होये!!
असं म्हणत तुकोबांनी ऐक्याचा मार्ग दाखविला.
धर्मगुरूंनी व एकनाथ महाराजांनी इथल्या लोकांना सलोख्याने राहण्याची, एकमेकांवर प्रेम करण्याची शिकवण दिली.पिंपरी चिंचवड शहरात भोसरी येथे संत ज्ञानेश्वर पालखीचे आगमन मंगळवार व बुधवार रोजी झाले असता पालखीत सहभागी असणाऱ्या वारकऱ्यांचे भोसरी येथील मुस्लिम बांधवानी सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवीले. वारकऱ्यांची गळाभेट घेत माऊली माऊली म्हणत मॅगज़ीन चौकात स्वागत केले. तसेच यावेळी वारकऱ्यांना फळे वाटप करत संतांच्या शिकवणी प्रमाणे आचरण करायला हवे आपली सामाजिक व राष्ट्रीय एकता जपायला हवी हा संदेश देण्यासाठी मुस्लिम बांधवानी एकत्र येत हा उपक्रम राबविला.या उपक्रमात सुरज कुलकर्णी, जहीर खान उर्फ छोटू भाई,फय्याज सनदी,इब्राहिम सय्यद,अकबर इनामदार,नईम शेख तसेच इतर मुस्लिम बांधवांच्या वतीने वारकऱ्यांसाठी हा उपक्रम राबविला.



















