सातारा(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०१.०४.२०२२:
महाबळेश्वर- सिंदोळा पार्क,मुस्लिम स्मशानभूमी येथे नगरपालिकेच्या वतीने पाण्याची सोय करण्यात आली.गेले अनेक दिवसांपासून येथे पाण्याची व्यवस्था नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. सदर ठिकाणी असलेल्या शेडच्या छताची दुरुस्ती करावी व स्वच्छ पाण्याची सोय करण्यात यावी अशी मागणी किरण गोरखनाथ शिंदे, संस्थापक अध्यक्ष बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्याकडे लेखी निवेदन देऊन मागणी करण्यात आली होती. त्यास मुख्याधिकारी यांनी प्रतिसाद देत सिंदोळा पार्क येथील मुस्लिम दफनभूमी मध्ये असणाऱ्या शेडवरील छत यापूर्वीच दुरुस्त करून घेतले आहे. आज येथे असणाऱ्या जुन्या बोअरवेलमध्ये मोटर बसवून नागरिकांना पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर काम पूर्ण केल्यामुळे संघटनेच्या वतीने व महाबळेश्वर बचाव आघाडीच्या वतीने किरण गोरखनाथ शिंदे यांनी मुख्याधिकारी पल्लवी पाटील, बांधकाम अभियंता श्री सस्ते, स्वच्छता व विद्युत विभागप्रमुख श्री आटवडकर,श्री हनिफभाई पन्हाळकर यांचे आभार मानले आहेत. तसेच या कामाचा पाठपुरावा करण्यात मदत करणाऱ्या सर्व सहकारी टीमचे देखील आभार व्यक्त केले आहेत. या कामामुळे मुस्लिम समाजातील नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाली असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.



















