निर्भीड पत्रकार
चंद्रपुर प्रतिनिधी, विपीन भालेराव
मूल मधील माँ दुर्गा सामाजिक व शैक्षणिक प्रतिष्ठान व्दारा चंद्रपूर मार्गावरील दुर्गा मंदिरात वृक्षरोपचा कार्यक्रम घेण्यात आला संपूर्ण महाराष्ट्रात १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प महाराष्ट्राचे अर्थ व वनमंत्री यांनी घेतला. याचीच जाणीव वृक्षाची समाजाला असलेली आवश्यकता लक्षात घेत जि. प.चंद्रपूरचे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वात माँ दुर्गा मंदिर येथे वृक्षरोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला त्या कार्यक्रमाला जय माता दि महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.ममताताई रावत येथील पोलिस स्टेशनचे ठाणेदार जयवंतजी चव्हाण बाजार समितीचे सभापती घनशाम येनूरकर संचालक राकेश रत्नावार ,राजेंद्र कन्नमवार नगरसेवक विनोद कांबळे उपस्थित होते.



















