ठाणे(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१६.१०.२०२२
नवी मुंबई- तुर्भे नाका मच्छी मार्केट लगत राज हॉटेलच्या समोरील बाजूस गोलडन बेकरी समोरील एमआयडीसी भूखंडावर राज रेस्टॉरंट अँड बार मालकाने /चालकाने अनाधिकृतपणे कब्जा केला असून दारू, चरस, गांजा नशा करणाऱ्या असामाजिक तत्त्वांनी आपले बस्तान मांडले आहे. सदर भूखंड असामाजिक तत्त्व नशेसाठी वापरत आहेत. ये जा करणाऱ्या स्थानिक रहिवासी महिला, बालकांसाठी हे अतिशय घातक स्वरूपाचे असून या ठिकाणी समाज उपयोगी वास्तू निर्माण व्हावी या आशयाचे पत्र वंचित बहुजन दिव्यांग आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते सुनील महादेव साबळे यांनी ‘डी’ विभागीय आयुक्त व एमआयडीसी उपविभाग क्र- १ उपअभियंता संतोष कळसकर यांना दिले असून तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी मागील वर्षी २१-०४-२१ रोजी करण्यात आली होती.
यानंतरही सुनील साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार वर्षभरापासून पाठपुरावा करून सुद्धा प्रशासकीय अधिकारी झोपेचे सोंग घेत असून कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत.
यात प्रशासकीय अधिकारी व असामाजिक तत्त्वांचे सुत जुळलेले आहे की काय ?अशी आशंका संतापलेल्या नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.



















