पिंपरी(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०३.११.२०२२
पिंपरी- मोशी येथील सरकार मान्य रेशन दुकानांमध्ये गोरगरीब नागरिकांना सरकारकडून आलेला अन्नधान्य पुरवठा वेळेत व व्यवस्थित होत नाही उलट ग्राहकांनाच ह्या दुकानाचे चालक एस,एस बोराटे अरे रवीने बोलून अपमानास्पद वागणूक देत आहेत त्यामुळे या दुकानाचा परवाना रद्द करून महिला बचत गटाला चालवण्यास द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माऊली बोराटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केले आहे. येथील रेशन दुकान एस एस बोराटे हे अनेक वर्षापासून चालवीत आहेत मोशीतील अन्य धान्य दुकानाचे परवाने ही त्यांच्याकडेच आहेत. गरिबांना तात्काळ न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनाच्या प्रती पुणे येथील अन्नधान्य वितरण अधिकारी, भोसरीतील ‘फ’ विभाग परिमंडल अधिकारी, भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहेत. निवेदनावर माऊली बोराटे, सीमाताई पांचाळ, लक्ष्मण पांचाळ, प्रवीण कोळी, माया बनसोडे, यांच्यासह ३१ नागरिकांच्याही सह्या आहेत. याबाबत दुकान चालक एस एस बोराटे यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध झाले नाहीत. ‘मोशी’ येथील सरकारमान्य रेशन दुकानावर गोरगरीब नागरिकांचा सरकार कडून आलेला हक्काचा अन्नधान्य पुरवठा वेळेच्या वेळी व व्यवस्थित देत नाहीत. नागरिक रांगा लावून उभे असतात.परंतु, रेशन दुकानाचे चालक त्यांना उलट सुलट बोलून अरेरावी करतात. त्यामुळे सामाजिक भान असलेल्या व गरीब, गरजू महिला बचत गटाला हे दुकान चालवण्यास द्यावे. अशी मागणी ज्ञानेश्वर उर्फ माऊली बोराटे शहराध्यक्ष राष्ट्रवादी पब्लिकन पार्टी पिंपरी चिंचवड यांनी केली आहे