चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क) तालुका प्रतिनिधी,
दि.०३.०१.२०२०
नागभीड- तालुक्यातील येणोली(माल) या गावात बौद्ध समाजातील महिलांनी पुढाकार घेऊन क्रातिज्योती सवित्रीमाई फुले यांची जयंती साजरी केली. बौद्ध विहारा पासून रॅली काढण्यात आली रॅली मध्ये गाणे व म्हणी म्हणत पूर्ण गावामध्ये रॅली फिरविण्यात आली त्या नंतर बौद्ध विहाराच्या पटांगणा मधे येऊन सावित्रीमाईच्या जीवनावर आदरीत स्त्रीशिक्षणाची जनक यांनी अखंड प्रयत्न करून सामाजिक परिवर्तन कसे घडवून आणले या बद्दलचे मार्गदर्शनातून श्री. फुलझेले सर यांनी सांगितले श्री.अमोल बावनकार सरपंच, सौ. अर्चना मेश्राम उपसरपंच, सौ. वर्षां सोनवणे ग्रा.पं. सदस्या, सौ. संगीता घुगुस्कार ग्रा. पं. सदस्य,महेश सोनवणे,राजुजी झोडे ग्रा.पं. सदस्य, यांची प्रमुख उपस्थितीमधे कार्यक्रम पार पाडला.



















