सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०२.०५.२०२०
सातारा- खंडाळा तालुक्यातील लोणंद येथिल गोटमाळ परिसरात श्री साई किराणा जनरल स्टोअर्सचे मालक श्री शिंदे आपल्या घरामध्ये प्रतिबंधित असलेला गुटखा, गायछाप तंबाखु, विमल पानमसाला,व अन्य तंबाखूजन्य पदार्थांची होलसेल विक्री सुरू असल्याचा व्हिडीओ निर्भीड पत्रकारच्या हाती लागला आहे. या व्हिडीओमध्ये शिंदे यांच्या घरामध्ये खुलेआम गुटखा विक्री सुरू असल्याचे दिसत असून केवळ ओळखीच्या व्यक्तींनाच विक्री करत असल्याचे दुकानदार बोलत आहे. एकीकडे प्रशासन गुटखा विक्रीच्या पुर्ण विरोधात असुन आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे अशाप्रकारे खुलेआम प्रतिबंधित गुटखा, तंबाखु व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जात असल्याचे चित्र आहे. याप्रकरणी काही पत्रकार बंधूंनी शिंदे यांच्याकडे विचारपूस केली व गुटखा मिळतो का याची विचारणा केली असता. त्याच्याकडे गुटखा असल्याचे दिसून आले. लोणंद गावातील काही ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करून याप्रकरणी कोणतीही कारवाई होत नसल्याचे म्हटले आहे. स्टिंग ऑपरेशनमध्ये शिंदे यांच्याकडे प्रतिबंधित गुटखा पुड्या, तंबाखु व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांकडून याप्रकरणी पोलीस व प्रशासनाने योग्य चौकशी करून कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्रजी शिंगणे यांच्याशी या प्रकरणी पत्र व्यवहार करणार असल्याचेही ग्रामस्थांकडून समजले.या प्रकरणाकडे सातारा जिल्हा अन्न व औषध प्रशासनाचे लक्ष्य नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान या विक्रेत्याकडून १५० रु. किमतीचा विमल पुडा पाचशे रुपये वाढीव किंमत घेऊन काळाबाजाराने विकला जात आहे. गोवा गुटखा, विमल पानमसाला, तंबाखु व अन्य तंबाखूजन्य प्रतिबंधित गुटख्याची उत्पादने शिंदे यांच्याकडे मिळून आल्याने याप्रकरणी लोणंद पोलीस काय कारवाई करतात की या प्रकरणी नेहमीप्रमाणे पोलिसांकडून डोळेझाक केली जाते हे पाहणे औसुक्याचे असेल अशी चर्चा आहे.



















