पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,कलिंदर शेख
दि.३१.०७.१९
पिंपरी- महाराष्ट्र राज्यामध्ये हजारो तृतीयपंथी भटकंती करून आपली उपजिवीका भागवत जिवनमान जगत आसताना त्यांना असंख्य आडथळे, संकटाला सामोरे जाऊन काटकसरीने आपले जिवन जगावे लागत आहे. तृतीयपंथीना सन्मानाने जिवन जगण्याचा आधिकार असुन त्यांची आर्थिक प्रगती होणे हे देखील महत्वाचे आहे. त्यासाठी त्यांना स्वःताचा उद्योग धंदा उभारण्यासाठी नव्याने आर्थिक विकास महामंडळ निर्माण करणे गरजेचे आहे. तरी आपण गांभीर्यने विचार करून तृतीयपंथी करिता स्वतंत्र महामंडळ निर्माण करावे. अशी विनंती निवेदना व्दारे शिवशाही व्यापारीसंघ संस्थापक अध्यक्ष श्री.युवराज भगवान दाखले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.



















