सोलापुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.३०.०६.२०२०
करमाळा- राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी माढा तालुक्यातील वैभव साळुंखे यांची निवड नुकतीच करण्यात आली आहे. सदर निवडीचे पत्र सोलापुर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या हस्ते आज देण्यात आले. नवनियुक्त जिल्हाध्यक्ष वैभव साळुंखे यांचा सोलापूर जिल्ह्यातील दांडगा जनसंपर्क असल्यामुळे राष्ट्रवादी संघटन वाढीसाठी त्यांना नव्याने ही जबाबदारी देण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेशाध्यक्ष सुनील पाटील यांनी दिली. याबाबत आमच्याशी बोलताना नवनियुक्त जिल्हाध्यक्ष म्हणाले की शरदचंद्र पवार साहेब, खा.सुप्रियाताई सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलदादा पाटील यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यत पोचवण्याचे काम राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन झिंजाडे यांच्या सोबत करणार असून सोलापूर जिल्ह्यातील मान्यवर नेते, आजी माजी कार्यकर्त्यासोबत काम करून संघटन मजबूत करणार आहे. पदविधरांचे सर्व प्रलंबित प्रश्न, व्यथा शासन दरबारी मांडणार असून ते अग्रक्रमाने सोडवणार आहे.सदर पत्र देतेवेळी राष्ट्रवादी विध्यार्थी संघटनेचे पुणे विद्यापीठ अध्यक्ष सोमनाथ लोहार, मुन्ना आरडे, राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश सदस्य नितीन झिंजाडे, राष्ट्रवादी किसान सभेचे करमाळा तालुका कार्याध्यक्ष सचिन नलवडे, अजित चव्हाण, कुणाल साळुंखे, नारायण चौधरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.



















