पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,कलिंदर शेख
दि.१९.०६.१९
निगडी- राहत वेल्फेअर ट्रस्ट यांच्या वतीने ईद-ए-मिलिंद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट समाजकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा शाल व सन्मानचिन्ह चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. हा आयोजित कार्यक्रम निगडी येथील मधुकर पवळे शाळा राहुलनगर सेक्टर नं.२२ येथे करण्यात आला.या वेळेस प्रमुख पाहुणे कामगार नेते मा.श्री.इरफान भाई सय्यद,मा.श्री. बाबू भाई शेट्टी उद्योजक,मा.श्री.राजेंद्र निकाळजे पोलीस निरीक्षक गुन्हे, मा.श्री.अखिलभाई मुजावर जेष्ठसमाजसेवक,मा.श्री.बापू शेठ घोलप उद्योजक,शफीउल्ला काजी,धम्माराज साळवे,मा.आयुब भाई तांबोळी उद्योजक,निर्भिड पत्रकार प्रतिनिधी दिलीप देहाडे सह इतर मान्यवर उपस्थित होते. पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे साहेबांनी सामाजिक ऐकते बद्दल मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष सद्दाम सय्यद तसेच कार्यक्रमाचे स्वागतकर्ते मोहसीन मणियार ,फिरोज पठाण,महेबुब शेख.तबरेज लोणी,इस्माईल बाटघर यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी पार पडला.



















