सोलापूर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१५.१०.१९
माळशिरस- विधानसभा २०१९ प्रचारार्थ दि.१५ऑक्टोबर रोजी माळशिरस येथे रिपाई ची सभा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ पार पडली. सभेच्या सुरुवातीस राम सातपुते यांनी भाषण केले. त्यानी आपल्या भाषणात भाजपाने या पाच वर्षात केलेले विकासाचे कामाचा आढावा सांगितला, माळशिरस मतदार संघातून मिळलेल्या संधीचा पूर्ण जनहित साठी काम करू, प्रत्येक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन असे यावेळी सांगितले. येणाऱ्या २१ तारखेला कमळ या बटांना पुढील बटन दाबून भरघोस मताने निवडून देण्याचे सर्व मतदार बंधू भगिनींना सांगितले. रामदास आठवले यांनी ही भाषण केले, भाषणाची सुरवात त्यांनी आपल्या शैलीत केले. विरुधी पक्ष आता पूर्णपणे संपलेलाआहे, पुन्हा एकदा आघाडीचे सरकार येणार असे मत व्यक्त केले. माळशिरस विधानसभा सभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार हे उत्तमराव जानकर यांनी चुकिच्या पद्धतीने एससीचा दाखला मिळवून निवडणुकीची उमेदवारी मिळवलेली आहे. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांचा पराभव निश्चित आहे असेही यावेळी सांगितले. व राम सातपुते हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिह मोहिते पाटील यांच्या पूर्ण मार्गदर्शना नुसार माळशिरस तालुक्यात विकासाची कामे करणार असल्याची खात्री दिली. यावेळी मंचावर विजयसिहं मोहिते पाटील, धैर्यशील पाटील, राम सातपुते, राजाभाऊ सरवदे, रीपाई पदाधिकारी उपस्थिती होते. सभेस जनसमुदाय मोठया प्रमाणात उपस्थित होता. यावेळी रिपब्लिकन जनशक्ती ने महायुतीस जाहीर पाठींबाचे पत्र सोलापूर जिल्हा अध्यक्ष अमित सोरटे, कार्यकर्ते नारायण पवार, प्रविण वाघमारे यांनी राम सातपुते यांना दिले आहे.



















