पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,फिरोज तांबोळी
दि.२३.०६.१९
पिंपरी- अल्पसंख्याक आघाडी पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचा समारंभ कार्यक्रम खराळवाडी येथे आयोजित करण्यात आला होता या वेळी गुणवंत दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या समारंभास विद्यार्थी व पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.या वेळी कार्यक्रमास पिं.चिं.जिल्हा अध्यक्ष जनाब अल्ताफ भाई शेख,युवानेते रिपाई उमेश गायकवाड, शहर उपाध्यक्ष अल्पसंख्याक, सालीम भाई सय्यद,वरिष्ठ नेत्या चंद्रकांताताई सोनकांबळे पिं.चिं. महिला शहराध्यक्षा (A) गट रशिदा खान,भोसरी उपाध्यक्षा हुरबानो पठाण, डॉ. मशमूम नजीर, पिंपरी विधानसभा अध्यक्षा शोभा नफाडे, चिंचवड विधानसभा अध्यक्षा सोनी मॅडम, पिं.चिं. शहर अल्पसंख्याक(A) गट सरचिटणीस जिलानी भाई सय्यद,पिं चिं शहर संपर्कप्रमुख अल्पसंख्याक असिफभाई शेख, पिं.चिं.शहर अल्पसंख्याक कार्याध्यक्ष विनोद गायकवाड, चिखली विभाग महिला अध्यक्षा फैमिदाअप्पा, भोसरी विधानसभा अध्यक्ष जमीर शेख, हाजुभाई शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी शहरातील नवनियुक्त पदाधिकारी यांना पद वाटप करुन नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले, या वेळी सर्व आर पी आय चे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित सदस्यांना भावी कार्यास शुभेच्छा देत समारंभ संपन्न झाला.



















