पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,कलिंदर शेख
दि.१४.०६.१९
भोसरी- वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व २८८ जागांवर उमेदवार उभा करण्याची घोषणा यापूर्वीच ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ॲड.प्रकाश आंबेडकरच्या सर्वात जवळच्या विश्वासातील एकमेव नाव रूहिनाज शेख यांना मैदानात उतरवण्याच्या हालचाली सुरू आहेत, तसे झाल्यास भोसरी विधानसभेतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकसभेला मुस्लिम चेहरा म्हणून रुहिनाज शेख यांना स्टार प्रचारक म्हणून लोकसभेचे उमेदवार राजाराम पाटील यांच्याबरोबर मावळमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी शहरात खेड्यापाड्यात गावोगावी जाऊन कॉर्नर सभा घेतल्या मावळचे उमेदवारा बरोबर मला काम करण्याची संधी मिळाली.त्याच कामाची पावती म्हणून आगामी विधान सभेच्या निवडणुकीला भोसरी विधान सभेतून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. रूहीनाज शेख यांनी दिवस-रात्र समाजाला न्याय मिळावा म्हणून सतत झगडत राहतात.गोरगरिबांसाठी अहो रात्री मदतीसाठी धावून जातात. बचत गट बचत गटातून अनुदान मिळवून देणे. महिलांना बचत गटातून लघु उद्योग सुरू करून दिले. गोरगरिबांची पेन्शन चालू करून देणे. मुलांच्या शिक्षणासाठी मदत करणे. लोकांसाठीच्या हक्कासाठी आंदोलन केले व त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले.
रूहिनाज शेख यांनी निर्भिड पत्रकार प्रतिनिधींशी चर्चा करताना सांगितले की ॲड. प्रकाश आंबेडकर हे मला नक्कीच माझ्या कामाला पहाता मला भोसरी विधानसभा मतदार संघातुन देतील. वंचित बहुजन आघाडीने मला संधी दिल्यास संधीचे सोने करणार असल्याचा दावा करत मला नक्कीच न्याय मिळेल.असा आत्मविश्वास रूहिनाज शेख यांनी दर्शविला आहे.



















