नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,शांताराम दुनबळे
दि.२७.११.१९
येवला- वंचित बहुजन आघाडी तर्फे मौजे सायगाव येथे २६ नोव्हेंबर संविधान दिन साजरा करण्यात आला.
यावेळी भारिपचे माजी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब अहिरे, शेतकरी संघटनेचे नेते वसंतराव खैरनार यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. यावेळी अहिरे यांनी सांगितले की भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना समता, स्वतंत्र, बंधुत्व, न्याय, मूलभूत अधिकार दिले आहे पण आज संविधानाने दिलेल्या विचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मूलभूत अधिकारांवर गदा आणली आहे. भारतीय संविधानाचा प्रत्येकाने सन्मान करायला हवा, पण काही मनुवादी विचार सारणीचे लोक समाजा समाजात तेढ निर्माण करत आहे. भारतीय संविधानाचा प्रचार प्रसार हा प्रत्येक घराघरात भारतीय नागरिकाने केला पाहिजे. यावेळी वसंतराव गायकवाड, किरण पठारे, उल्हास पठारे, आंबदास मोरे, अनिस शेख, धनराज कांबळे, पंकज पठारे, संतोष खरे आदींसह वंचितचे कार्यकर्ते यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन केले.



















