चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क) नेटवर्क,
दि.१९.०५.२०२०
चिमूर- तालुक्यातील ताडोबा कोअर व बफर झोन लागत असलेल्या सातारा शेतशिवारातील जंगलामध्ये महिला तेंदूपत्ता तोडण्या करीता गेली असतांना दबा धरून बसलेल्या वाघाने सकाळी ६.३० अचानक पण केलेल्या हल्ल्यात लिलाबाई चंद्रभान जीवतोडे वय ६३ वर्षे रा.कोलारा ही महिला जागीच ठार झाली आहे. या परिसरातील ही चौथी घटना आहे. गावाला जंगल लागुन असल्याने वाघासह इतरही वन्यप्राणी या भागात नेहमीच वावरत असतात सदर महिला आपल्या कुटुंबाचे पालनपोषण मोल मजुरी करूनच करायचे या पूर्वी कोलारा येथील शेतकरी व महिलेला व सातारा येथील महिलेला वाघाने ठार मारले होते त्या मुळे परिसरातील जनता वाघाच्या दहशत मध्ये वावरताना दिसत आहे. शेंडे वनपरिक्षेत्र अधिकारी, कोडापे वनपाल, नवघरे वनरक्षक वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.



















