पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,कलिंदर शेख
दि.२०.०९.१९
पिंपरी- शहरातील गोरगरीब जनतेसाठी वरदान ठरलेले वायसीएम रुग्णालय आजमितीस ढेकणांचे माहेरघर बनले आहे. वायसीएम रुग्णालयात अनेक व्याधींनी ग्रस्त रुग्ण आहेत.त्यांना हे ढेकूण चावून परेशान करत असल्याची माहिती समोर आली आहे. याची तातडीने दखल घेऊन उपाययोजना करण्याची मागणी लोक जनशक्ती पार्टी केली आली आहे. यासंबंधीचे निवेदन नसीम शेख यांनी महानगरपालिका आयुक्तांना दिले आहे.निवेदनात म्हटल्याप्रमाणे “या ढेकणांमुळे अनेक गंभीर आजार उद्भवत आहेत याला जवाबदार कोण ? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.लाखो रुपये वायसीएम वर खर्च केला जातात.रुग्णालयात आयसीयूमधील रुग्णांना उपचार मिळत नाहीत,वेळेवर गोळया व औषधे मिळत नाहीत,अपुर्या प्रमाणात औषध पुरवठा होत आहे.गंभीर स्वरुपाच्या आजारांवरची औषधे देखील उपलब्ध नाहीत,तरी आयुक्तांनी त्वरीत या बाबींची दखल घ्यावी व कारवाई करावी, अशी विनंती नसीम शेख यांनी निवेदना द्वारे केली आहे.



















