बीड ( निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, प्रफुल्ल जाधव
दि.२६/१०/१८
वंचित बहुजन वर्गाचे प्रश्न सोडविण्यासाठी व त्यांना सत्तेत बसवण्यासाठी विद्यार्थ्यांनो सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी युवकांची मोठी फळभ निर्माण करा असल्याचे परिवर्तनवादी विचार मान्यवरांनी व्यक्त केले
भारिप बहुजन महासंघ प्रणीत सम्यक विद्यार्थी आंदोलन आष्टी तालुका वतीने बुधवार दि (२४)आॅक्टोबर रोजी शहरातील अण्णाभाऊ साठे सभागृह येथे विद्यार्थी परिषदेसह सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी मान्यवर उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करताना बोलत होते यावेळी मार्गदर्शन म्हणून अॅड अरूण जाधव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाॅ गणेश खेमाडे सर जामखेड भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब गायकवाड भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष जोगदंड पञकार सुनील डोंगरे निकाळजे सर आदी मान्यवर उपस्थित होते.उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करताना अॅड अरूण जाधव म्हणाले की देशात विषमतावादी विचार धारेच्या सरकारने बहुजनांचे वाटोळे करून टाकले आहे त्यामुळे आपले प्रश्न जशाच तसे रखडले आहे राज्याच्या सत्तेच्या चाव्या आता नाही तर मग कधीच नाही त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये अॅड प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी युवकांनी एकजुटीने रहावे असे जाधव म्हणाले. डाॅ.गणेश खेमाडे म्हणाले की सम्यक विद्यार्थी आंदोलन ही भारिप प्रणीत विद्यार्थी चळवळ आहे या चळवळीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम सम्यक विद्यार्थी आंदोलन करित आलेले आहे त्याकरिता आपण सर्वांनी मिळून जास्तीत जास्त विद्यार्थी सभासद करावेत असे आवाहनही डाॅ गणेश खेमाडे यांनी केले.यावेळी प्रा.गणेश खापे संतोष जोगदंड यांच्या आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले विद्यार्थी परिषद व सदस्य नोंदणी कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलन बीड जिल्हाउपाध्यक्ष किरण जावळे,भारिप बहुजन महासंघाचे युवक तालुकाध्यक्ष आकाश कांबळे,बबलू आखाडे,शेषराव घुगे,सम्यक विद्यार्थी आंदोलन आष्टी तालुका उपाध्यक्ष मनोज सावंत,संदिप साळवे माळी समाजामधुन बौद्ध धर्म स्वीकारलेले वसंत धोंडे,संतोष कांबळे,बाळु कांबळे,विकी काकडे विकास गजघाट,सुशील कांबळे यांच्यासह सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या पदाधिकारी यांनी मोलाचे परिश्रम घेतले.



















