रत्नागिरी(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.१७.१२.२०२०
चिपळूण- गुढे-धनगरवाडी येथील एका शेतकऱ्याच्या गाय व वासराला विद्युततारेचा तीव्र झटका लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी (दि.१४) सायंकाळी ही घटना घडली. गुढे धनगरवाडी येथील शंकर बाबू शिंगाडे यांच्या मालकीची ही जनावरे असून, त्यांनी गुरे चरायला सोडलेली असताना ही घटना घडली. या घटनेचा पंचनामा तलाठी गोंधळेकर यांनी केला असून शिंगोडे यांचे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.



















