सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१५.०७.२०२०
शिरवळ- महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते ना. प्रविण दरेकर यांनी अनुप सुर्यवंशी यांच्या विनंती वरून सातारा जिल्ह्यातील कोरोना पॉसिटीव्हची शंभरी पार करून हाॅट स्पाॅट बनलेल्या शिरवळ मधील क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैदयकीय महाविद्यालय येथील क्वरांटाईन सेंटरला अचानक भेट दिली. यावेळी तेथील काॅरंटाईन व्यक्तींनी होत असलेल्या गैरसोईबाबत अनेक तक्रारी केल्या पेशंटची होत असलेली हेळसांड, अॅम्बुलन्स सेवा, डाॅक्टरांचे दुर्लक्ष, गरम पाण्याबाबतीत गैरसोय, स्वच्छता गृहाची प्रचंड अस्वच्छता, लहान मुलांच्या दुधाची व जेवणाची गैरसोय आणि वयोवृद्ध लोकांचे हाल अशा अनेक तक्रारी व प्रश्न कोवीड सेंटर मधील दाखल असणार्या महिला वर्ग, वयोवृद्ध लोक, तरूण वर्ग या सर्वांनी कोवीड सेंटरमधील दुरावस्थे विषयी तक्रारीचा पाढा ना. प्रविण दरेकर यांच्या समोर वाचला
या वेळी दरेकर यांनी या सेंटरची प्रत्यक्ष पाहणी केली असता दुरावस्था आढळून आली. स्वच्छतागृह अस्वच्छ होते. तेथील लहान मुलांना दूध मिळत नसल्याची बाब निर्दशनास आली, त्यानंतर तेथे उपस्थित खंडाळ्याचे तहसिलदार, तालुका आरोग्य अधिकारी यांना येथील क्वाराटाईन सेंटरमधील सर्व गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने आवश्यक त्या सर्व सुधारणा करण्याचे निर्देश दिले.
या नंतर उपस्थित पदाधिकारी यांनी शिरवळ एमआय डीसी मधील कंपन्या शिरवळ मधील कामगार वर्गाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुध्दा कामावर हजर राहण्याची जबरदस्ती करीत असल्याची बाब दरेकर यांच्या सांगितली असता या विषयी जिल्हाधिकारी सातारा यांच्याशी चर्चा करून कामगार वर्गाला दिलासा देण्याचे आश्वासन देखील या वेळी दिले. वेळी भाजपा सातारा जिल्हा संघटन सरचिटणीस अनुप सूर्यवंशी, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष व नायगाव चे माजी सरपंच निखिल झगडे, भाजपा खंडाळा तालुका अध्यक्ष राहुल हाडके, शिरवळ शहर अध्यक्ष नीलकंठ भूतकर, शिरवळ ग्रापंचायत सदस्य महेश जाधव, हर्षवर्धन शेळके पाटील, कामगार युनियन प्रतिनिधी राजेंद्र मगर, कौशिक जोशी, इम्रान काझी, अजिंक्य कांबळे, हितेश जाधव, शुभम गुजर, उमाकांत राठी, सुनील कांबळे आदी उपस्थित होते. नंतर खंडाळा नगर पंचायत व परिसराच्या प्रश्नी भाजपा नेते अनिरुद्ध गाढवे यांनी नगराध्यक्ष प्रल्हाद खंडागळे, नगरसेवक दत्तात्रय गाढवे, नगरसेवक साजिद मुल्ला यांच्या सोबत ना.दरेकर यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.



















