सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,सुभाष जाधव
दि.२९.०९.१९
सातारा- वाई, कोरेगाव व फलटण विधानसभा मतदार संघाचे खर्च पडताळणी निरीक्षक विक्रम कौशीक यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सुरु करण्यात आलेल्या विविध कक्षांनी भेटी दिल्या.प्रारंभी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी खर्च पडताळणी निरीक्षक श्री. कौशीक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.खर्च पडताळणी निरीक्षक श्री.कौशीक यांनी लोकसभा पोटनिवडणूक नामनिर्देशन कक्ष,आचार संहिता कक्ष,निवडणुकीच्या अनुषंगाने सुरु करण्यात आलेल्या तक्रार निवारण कक्ष,माध्यम कक्ष,खर्च पडताळणी कक्षास भेटी दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी तथा आचार संहिता कक्ष प्रमुख रामचंद्र शिंदे यांनी या कक्षांमार्फत कोणती कामे करण्यात येणार आहे व कामाचे स्वरुप या विषयी सविस्तर माहिती यावेळी श्री. कौशीक यांना दिली.



















