बीड(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क (प्रतिनिधी)प्रतिनिधी,
दि.३१.०७.२०२१
आष्टी- महाराष्ट्रात सर्वत्र कोविड १९ ने हाहाकार माजवला असताना, अशा कठीण काळात, व कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत, स्वतःच्या जीवाची परवा न करता, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत, कोरोना निर्मूलनासाठी भरीव योगदान देणारे, आरोग्य क्षेत्रातील, डॉक्टर, नर्स, वार्डबॉय, आशासेविका, सफाई कर्मचारी, स्मशान भूमी कर्मचारी, विद्युत कर्मचारी, शिक्षक, ग्रामसेवक, गृहविभाग, महसूल विभागातील कर्मचारी,

सामाजिक संस्थेचे स्वयंसेवक, मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्ट कर्मचारी, कोविड सेंटर कर्मचारी, पत्रकार बांधव, आधीना, राज्याचे माजी मुख्यमंत्री, तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसनिमित्त आष्टी येथील आयोजित, कोरोना योद्धा, कृतज्ञता सोहळ्यात, विविध क्षेत्रातील मंडळीना त्यांच्या उल्लेखनीय कामाची पोहच पावती मिळावी, त्यांना नवी ऊर्जा, प्रेरणा, पाठबळसह मिळावे, त्यांचा योग्य वेळी उचित सन्मान होवा यासाठी, विधानपरिषद आमदार सुरेश धस यांच्या दूरदृष्टी संकल्पनेतून व आ.सुरेश धस मिञ मंडळाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात, महाराष्ट्रातील प्रसिद्ध, समाजप्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदूरीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभहस्ते या सर्व कोरोना युद्धांनां सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन

सन्मानित करण्यात आले. समाजकारण आणि राजकारण रक्तातच असावं लागतं आणि ते कसं करावे हे आ.धसांनी दाखवून दिले असे गौरवोद्गार इंदुरकर महाराज यांनी काढले. यावेळी तालुक्यातील वैद्यकीय, राजकीय सामाजिक प्रशासकीय, विविध क्षेत्रातील सर्व जेष्ठ मान्यवर मंडळी आवर्जून मोठया संख्येने उपस्थित होते.



















