चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.३०.०४.२०२०
चिमूर- तालुक्यातील विहिरगाव येथील ग्रामपंचायत तर्फे ग्राम पंचायत कार्यलयात अपंगसाठीचा ५ टक्के राखीव निधीतून लाभार्थ्यांना भेट वस्तू म्हनून पंख्याचे वाटप करून गारवा दिल्याने लाभार्थ्यानी समाधान व्यक्त केले आहे. संचारबंधीचा नियमाचा उल्लंघन न करता व सोशल डिस्टनचा पालन करून मास्क, साबण आणि पंखेचे भेट वस्तू वाटण्यात आल्या, विहिरगाव ग्राम पंचायत ने अनेक योजनेच्या मद्यमातून लोकांना प्रत्येक घटकांना न्याय कसा देता येईल त्या अनुषणगंने लक्ष दिल्या जात आहे भेट वस्तू वाटप करते वेळी सरपंच कैलास ठवरे, नैताम ग्राम सेवक, हेमराज ठवरे, शेख ग्राम पंचायत कर्मचारी, मुंडरे परिचालक व लाभार्थी उपस्थित होते.



















