सोलापुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,संतोष पवार
दि.२६.०६.१९
करमाळा- मृत्यूंजय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था करमाळा यांच्या वतीने राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंती निमीत्त डी.जे., डॉल्बी साठी होणारा वायफळ खर्च टाळून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, गणवेश व खाऊ वाटप करण्यात आला. पावसाळा सुरू होवूनही अद्यापही पावसाचे आगमन करमाळा तालुक्यात झालेले नसून करमाळा तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणून घोषीत करण्यात आलेला आहे. या गोष्टीचा विचार करूनच हा निर्णय संस्थेच्या वतीने घेण्यात आला.
राजर्षी शाहु महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन – शिलराज कांबळे, गणेश कांबळे, समाधान दणाने, सुर्यकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजर्षी शाहु महाराज यांनी केलेल्या सामाजिक, शैक्षणीक कार्याविषयी व त्यांच्या जीवनाविषयी समाधान दणाने, प्रविण चव्हाण, किरण मोरे, साधु चौथमल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शिलराज कांबळे, गणेश कांबळे, समाधान दणाने, सुर्यकांत शिंदे, साधु चौथमल, एम.डी.माहुले, प्रविण चव्हाण, पांडूरंग इरकर, किरण मोरे, सिध्दार्थ कांबळे, दत्तात्रय ओहोळ, रामदास साळवे, हनुमंत पवार, शिवाजी शिंदे, रोहित भैलूमे, किरण धनवे, अविनाश कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.सदर कार्यक्रम नगरपरिषद मुला-मुलींची प्राथमिक शाळा, मौलालीनगर करमाळा येथे संपन्न झाला. यावेळी मुख्याध्यापक मारूती जाधव व उपशिक्षक किशोर भागवत, विद्यार्थी-विद्यार्थीनी व पालकवर्ग व संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.



















