चंद्रपुर (निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,योगेश्वर शेंडे
दि.२५.०७.१९
नागभीड- जि. प.गट नेता डॉ.सतिश वारजूकर यांच्या नेतृत्वात निघाला मोर्चा हजारोंच्या संख्येत शेतकरी उपस्थित निर्सगाच्या अवकृपेमुळे यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे शेतकऱ्यांना व शेतमजुरांना अत्यंत अडचणीचा सामना करावा लागत आहे. पेरणी केलेले धान मरण्याच्या अवस्थेत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओळवले आहेत त्याच बरोबर आबेक शेतकऱ्यांच्या विजेच्या जोडण्या प्रलंबित असून अनेक शेतकऱ्यांची शासनाने घोषित केला प्रमाणे कर्ज माफी झालेली नाही.सन २०१७.१८ या वर्षी घोषित झालेला पिक विमा शेतकऱ्यांना मिळालेला नाही तुळतुडा,बाधित अनेक शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अतिशय निराशा पसरलेली असून त्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. या सर्व मागण्यासाठी जि. प.गट नेता डॉ.सतीश वारजुकर यांनी हजारोच्या संख्येने कांग्रेस कार्यालयातुन तहसील कार्यालयावर धडक मोर्चा नेण्यात आला. नागभीड येथील तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात संपूर्ण नागभीड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा, दुष्काळी परिस्थिती बघता शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर हेक्टरी २५.००० हजार रुपये मदत देण्यात यावी, शेतकऱ्यांचे विजेचे बिल संपूर्ण माफ करण्यात यावे, शेतकऱ्यांच्या प्रलंबित वीज जोडण्या त्वरित लावण्यात यावे, महात्मा गांधी रोजगार हमी योजना बंधन मुक्त करून योजने अंतर्गत सर्व कामे त्वरित सुरू करण्यात यावी, कामगार आयुक्तालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या गवंडी कामगार योजनेमध्ये शेतकरी व शेत मजुरांचा समावेश करून त्यांना योजनेचा लाभ देण्यात यावा, शेतकऱ्यांची थकीत कर्जे त्वरित माफ करण्यात यावी, घोडाझरी अभयारण्यालगत असलेल्या कचेपार, धामणगाव चक, येणोली, गोविंपुर, मागरूळ, खडकी, सोनापूर घोडाझरी इतर गावातील शेतकऱ्यांना जंगल परिसरात असलेल्या मालकीच्या शेतामध्ये जाण्यास मनाई करण्यात येऊ नये,जंगली जनावरामुळे होणाऱ्या पिकाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना त्वरित देण्यात यावी, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ वृध्दपबकाळ योजना, अंतर्गत थकित असलेली लाभार्थ्यांचे रक्कम त्वरित वितरित करण्यात यावी, नागभीड येथे, राममंदिर चौक व टिपाइंट चौक नियमित बस थांबा देण्यात यावा, या सर्व मागण्या शासनाने मान्य करून शेतकरी व शेतमजूर तसेच सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यात यावा अन्यथा तालुका कांग्रेस कमिटी कडून सर्व सामान्य शेतकरी, शेतमजूर व जणते सोबत तीव्र आंदोल करण्यात येईल अशा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी जि. प.गट नेता डॉ.सतीश वारजूकर, प्रफुल खापर्डे, पंजाबराव गावंडे, प्रा.डॉ.मोहन जगनाडे, डॉ.रवींद्रजी कावडे, विजयजी गावंडे, खोजराम मरसकोल्हे, गोपालजी दडमल, अरविंदजी देशमुख, नयनाताई गेडाम, विनोद बोरकर, प्रनयाताई गड्डमवार, रंजनाताई पेंदाम, जोसना वारजूकर, सविता चौधरी, भावना चौधरी, गिता नन्नावरे,धनश्री काटेखाये,आशाताई गायकवाड, दांडेकर ताई, माटे ताई, सारिका धारने, दिनेश गावंडे, बंडू खोब्रागडे, रोशन ढोक, शिरीष वानखेडे, प्रतीक भसीन, विजय अमृतकर, विजयजी डाबरे, विजयजी ठाकरे,रमेश ठाकरे, अनंतकुमार राहुड, अमोल वानखडे, गौतम पाटील, समीर शेख, कांग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते शेतकरी शेतमजूर हजारोच्या संख्येने उपस्थित होते.



















